खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या रासायनिक कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांचा टाइम्स ग्रुपच्या वतीने टाइम्स व्हिजनरी लीडर्स २०२२ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. टाइम्स ग्रुपचे डेप्युटी चिफ मॅनेजर प्रथमेश केळकर यांच्या हस्ते वाघ यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लोटे ओद्योगीक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या रासायनिक कंपनीचे चेअरमन सतीश वाघ हे गेली अनेक वर्षे रासायनिक उद्योगक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. सुप्रिया लाइफ सायन्स या रासायनिक कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आहे. या रासायनिक कारखान्याचे चेअरमन डॉ. सतीश वाघ यांचा सामाजिक कार्यामध्येही सिंहाचा वाटा असून कारखाना व्यवस्थापनाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. डॉ. वाघ यांच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत टाइम्स ग्रुपच्या वतीने त्यांना टाइम्स व्हिजनरी लीडर्स २०२२ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबईतील जुहू येथील नोवोटेल हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.