रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदार संघात निवडणुकीपूर्वी मतदान यादीत झालेला घोळ आता चव्हाट्यावर आल आहे. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे , ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक मतदारांच्या मतदार यादीतील नावासमोर चक्क डिलीट चा शिक्का मारला गेला आहे , काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले अशा अनेकांच्या नावासमोर डिलीट चा शिक्का मारला गेल्याने हा घोळ नेमका कोणी केला असा प्रश्न उपस्थित झाला आहे , अशा अनेक तक्रारी दाखल झाल्याने महाविकास आघाडीचे दापोली विधानसभा मतदार संघाचे उबाठा चे उमेदवार संजय कदम आक्रमक झाले असून , सत्तेचा गैर फायदा घेऊन प्रशासनाला हाताशी धरत महाविकास आघाडीच्या शेकडो मतदारांची नावे अशा प्रकारे मतदार यादीतून डिलीट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज माजी आमदार संजय कदम यांनी खेड तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन हि बाब तीव्रतेने निदर्शनास आणून दिली.

Google search engine
Previous articleआदित्य ठाकरे दिवाळी आधीच राजकीय फटाके फोडणार, २८ ऑक्टोबरला दापोलीत विराट सभा होणार
Next articleयंदा दिवाळी ४ दिवस; कधी आहे लक्ष्मी पूजन, भाऊबीज? जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here