मुंबई : मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आज खंडणीच्या प्रकरणात न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्या १० दिवसांची कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने या मागणीवर विचार करून, ६ नोव्हेंबरपर्यंत सचिन वाझे यांना गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे.
तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून नजरकैदेत राहण्यासाठी बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाझेंना नजरकैदेत ठेवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला आहे. वाझे हा नजकैदेत ठेवल्यास पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटले होते की सचिन वाझेंवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, त्यामुळे त्यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती एएनआय ने न्यायालयाला केली आहे.

Google search engine
Previous article‘बॉम्ब फुटायची वाट बघतोय’फडणवीसांच्या बॉम्ब फोडण्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रतिक्रिया
Next articleमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here