चिपळूण : कोहिनूर प्लाझा येथील घर फोडून 3 लाख रूपये किमतीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना मे ते ऑक्टोबरच्या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या मुलगी व जावयावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावई रहिमतुल्ला युसूफ खोत व मुलगी वहिदा रहिमतुल्ला खोत (दोघे रा. पेठमाप, चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद जुबेदा हमीद तांबे (रा. मालदोली मोहल्ला) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेदा तांबे यांची शहरातील कोहिनूर प्लाझा येथे सदनिका आहे. दि. 23 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत जावई रहिमतुल्ला खोत व मुलगी वहिदा खोत यांनी घर फोडून त्यातील कपाट उचकटले व त्यातील सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, चेन, कडा, हार असे एकूण 3 लाख 5 हजार 139 रूपये किमतीचे दागिने चोरले. तसेच रोख 25 हजार रूपयेही चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.