उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान; नवोदित कलाकारांसाठी ठरले प्रेरणादायक
रत्नागिरी – ‘काय समाजलीव’ प्रस्तुत ‘रत्नागिरी रील स्पर्धा 2025’ मध्ये प्रथमेश पवार यांनी उत्कृष्ट अभिनय, सुरेख छायांकन आणि एकूण कलात्मक सादरीकरणासाठी तीन प्रमुख सन्मान पटकावत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या रीलला द्वितीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्कृष्ट छायांकन असे तिहेरी पुरस्कार मिळाले.
या गौरवप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रथमेश यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान रत्नागिरीतील नवोदित कलाकारांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरला आहे.
३ ऑगस्ट रोजी अंबर हॉल, टी.आर.पी., रत्नागिरी येथे पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात जिल्ह्यातील अनेक डिजिटल क्रिएटर्स, रसिक प्रेक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून १३० हून अधिक रील्स सहभागी झाल्या होत्या. प्रथमेश पवार यांच्या टीमने सादर केलेल्या रीलमध्ये प्रगल्भ अभिनय, उत्तम कथानक आणि तांत्रिक सफाई यामुळे त्यांचे काम निर्णायकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरले.
या यशावर प्रतिक्रिया देताना प्रथमेश म्हणाले, “या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळणे ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले. ‘काय समाजलीव’चे आणि रत्नागिरीकर प्रेक्षकांचे मनापासून आभार!”
#रत्नागिरीरीलस्पर्धा2025 #प्रथमेशपवार #उदयसामंत #कायसमाजलीव #रत्नागिरीनवोदितकलाकार #RatnagiriReelCompetition #ReelAwardRatnagiri #DigitalCreatorsKonkan #BestActorReel #BestCinematographyReel #TRPAmbharHall #mazekokan #KonkanTalent