रत्नागिरी: रत्नागिरी शहराजवळ हातखंबा येथे लाखो रुपयांची काजू बी चोरी होण्याचा प्रकार तब्बल दोनवेळा घडला होता. त्यामुळे रत्नागिरी पोलीसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री २९ जूनला रत्नागिरी ग्रामीण पोलीस गस्ती पथकाच्या संतर्कतेमुळे तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठे यश आले आहे. आरोपींकडून आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयितरित्या ह्युंदाई कार गोळप परिसरात उभी होती. पण पोलीसजवळ येताच ही कार चालकाने सुसाट नेली. यानंतर सुरू झाला थरारक पाठलाग. कार पावसच्या दिशेने सुसाट गेली. गस्ती पथकाने प्रसंगावधान ठेवत तात्काळ पूर्णगड पोलिसांना याची माहिती दिली. पावस येथे ही कार थांबवून चौकशी करून तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले.

सांगली, कोल्हापूर, गोवा येथील तिघांच्या मुसक्या आवळल्या

रज्जाक असलम मुजावर, वय २३, इनाम पट्टी ता. मिरज जि. सांगली , साहिल इसाक सायनावाले, वय २२, रा. करासवाडा म्हापसा, बार्देश नॉर्थ गोवा,  अक्षय संतोष पाटील, वय २४, रा. देवकांडगाव ता. आजरा जि. कोल्हापूर यांना तात्काळ ताब्यात घेवून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे तपासात अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार क्र.एम.एच.०९/ एफएल / ४१७६ गुन्ह्याकरीता वापरण्यात आलेली हत्यारे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल असा एकूण ८,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

 

डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्याकडून गस्ती पथकाचा गौरव

पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, उपविभागिय पोलीस अधिकारी वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली ही मोठी तपास मोहिम फत्ते झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य, जाधव पूर्णगड पोलीस ठाणे, दत्ता शेळके, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे व पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी इंदुलकर, सतीश साळवी (चालक), हवालदार उदय वाजे, पोलीस नाईक वैभव मोरे तसेच पूर्णगड पोलीस ठाणेचे हवालदार ललीत देनुसकर, योगेश भातडे (चालक) यांनी ही मोठी कामगीरी बजावली आहे. या सगळ्या पोलीस टीमने सतर्कता बाळगून ही कामगिरी बजावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याहस्ते त्यांचा गुरूवारी ३० जूनला गौरव करण्यात आला

Google search engine
Previous articleमुंबई गोवा-महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग
Next articleवरंध घाट आजपासून 3 महिने वाहतुकीसाठी बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here