रत्नागिरी : प्रतिपंढरपुरात वारकरी विठुरायाच्या जयघोषात दंग

- Advertisement -

रत्नागिरी : मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्‍या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीला  प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे तीन हजार वारकऱ्यांनी  विठुरायाच्या नामाचा गजर करत वारीत सहभाग घेतला . पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि हातात टाळ व मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत वारकऱ्यांनी फुगड्या घातल्या, गोल रिंगणही केले. पावसाने देखील थोडा वेळ विश्रांती घेतल्याने वारकऱ्यांचा उत्साह वाढला.

अनेकांना मनात असूनही पंढरपूरला वारीला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदा प्रथमच या वारीचे नियोजन करण्यात आले. हनुमान मंदिर (सडा), विठ्ठल मंदिर देवस्थान समिती यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू जनजागृती समिती,  बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय सेवा समिती, हिंदू राष्ट्र सेना, जनजागृती संघ यांच्या पुढाकाराने वारीचे चोख नियोजन करण्यात आले. लायन्स क्लब, रोटरी क्लब, शिवरूद्र ढोल पथक, विविध भजनी मंडळे, इस्कॉन, भंडारी समाज इतर सर्व ज्ञाती संस्था, महिला मंडळ, वकील संघटना, व्यापारी संघटना यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध रूपातील मदत केली.

पाऊस असला तरीही वारीत सहभागी होण्याची इच्छा अनेकांनी बोलून दाखवली.सकाळी ७ च्या सुमारास मारुती मंदिर येथून टाळ मृदुंगाच्या साथीने विठुनामाचा गजर करत, भजने म्हणत वारी निघाली. पहिले वारकरी माळनाका येथील स्काय वॉकजवळ असताना शेवटचे वारकरी मारुती मंदिरपाशी होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी झाले होते. वारी हळुहळू जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका मार्गे विठ्ठल मंदिरात पोहोचली. तेथे वारीचे स्वागत विठ्ठल मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आले . सर्व वारकऱ्यांनी रांगेत उभे राहून विठुरायाचे दर्शन घेतले.

पालखी आणि विठुरायाच्या प्रतिमेसह ध्वज सुद्धा

विविध शाळांतील विद्यार्थीसुद्धा वारीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः महिला वारकऱ्यांची गर्दी जास्त प्रमाणात होती. या वारीत जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी सहभागी झाल्यामुळे त्यांच्या भक्तिरसाची अनुभूती याची देही याची डोळा, अनुभवता आली. सामाजिक समतेचे दर्शन या वारीमधून घडले . वारीमध्ये पालखी, विठुरायाच्या प्रतिमेसह ध्वज देखील फडकत होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles