गेले दोन दिवस हुलकावणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे सक्रियता दर्शवली. मात्र, त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतली . जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी पाऊस गायब झाल्याने जिल्ह्याच्या खरीप लागवड क्षेत्रात मान्सून च्या सक्रियतेबाबत साशंकता निर्माण झालेली आहे . दरम्यान येत्या चार दिवसांत कोंकण किनारपट्टीवर पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने कायम ठेवली आहे.
गुरुवारी संपलेल्या चोवीस तासांत ६.४४ मि. मी. च्या सरारीने एकूण ५८ मि. मी . पावसाची नोंद झाली . सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी तालुक्यात झाली. तालुक्यात गुरुवारी रात्री पावसाने दमदार सक्रियता दाखवली. मात्र, त्यानंतर पावसाने दिवसभर उसंत घेतल्याने कडकडीत उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. दापोली तालुक्यात १८ मि. मी., चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी ५ मि. मी. तर मंडणगड आणि खेड तालुक्यात प्रत्येकी २ मि. मी . पावसाची नोंद झाली .
कोंकणात मान्सून सक्रिय होण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. २९ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला. त्यांनतर तामिळनाडू,कर्नाटकाच्या काही भागासह गोव्याच्या सीमेवर दाखल झाला.यावेळीही मान्सून ने दहा दिवसांचा ब्रेक घेतला . हवामान अनुकूनल झाल्यांनतर मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा होती. मात्र याच आठवड्यात रविवार , सोमवार आणि मंगळवारी पाऊस गायब झाला. यामुळे आता पाऊस नेमका कधी पडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. येत्या ४८ तासात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र याबाबतही शक्यता कमीच आहे.