खेड : रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेलया खेड मधील जगबुडी नदीने मध्यरात्री धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ७ मीटर इतकी झालेली असून त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा पूरप्रवण क्षेत्रामध्ये आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे . जरी अद्याप कुठेही पूर परिस्थिती निर्माण झालेली नसली तरी मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास अंतर्गत मार्ग बंद होण्याची शक्यता आहे . तसेच खेड शहरांमध्ये देखील पुराचे पाणी भरण्याची शक्यता आहे.