रत्नागिरी : गोविंदा रे गोपाळा.तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदम गोविंदा पथकांच्या थराचा थरथराट यंदा पहायला   मिळणार आहे. यंदा दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.

जिल्हयात यावर्षी 251 सार्वजनिक तर 2339 ग्वाजगी हंड्या उभारण्यात येणार आहेत. तर 8 ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.दहीहंडी सर्वत्र जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवात तरुणांचा जल्लोष असतो. दहीहंडी उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथक सज्ज झाली असून काही पथकांमार्फत सराव सुरू आहे. मुंबई पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यातही दहीहंडीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. सात ते आठ थर असणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी जिल्ह्यातील पथकांसह जिल्ह्याबाहेरची पथकेही येतात.

गतवर्षी महाराष्ट्र सरकारने सन 2012 मध्ये जाहिर केलेल्या क्रीडा धोरणात गोविंदाच्या साहसी क्रीडा प्रकारात समावेश केला आहे. गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी गोविंदा पथकांवरच राहणार आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर यासह इतर सर्व उपाययोजनांची व्यवस्था गोविंदा पथकांनाच करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील गोविंदा उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज झाले असून जिल्ह्यात यावर्षी 251 सार्वजनिक तर 2339 खासगी दहीहंड्या फोडल्या जाणार आहेत. सर्वाधिक हंड्या जयगड, दापोली, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत.

रत्नागिरी शहर सार्वजनिक 6 खासगी 70, रत्नागिरी ग्रामीण सार्वजनिक 55 खासगी 66, जयगड सार्वजनिक 15 खासगी 132, राजापूर सार्वजनिक 35 खासगी 50, नाटे सार्वजनिक 1 खासगी 96, लांजा सार्वजनिक 27 खासगी 55, देवरूख सार्वजनिक 8 खासगी 30, संगमेश्वर सार्वजनिक 7 खासगी 100, सावर्डे सार्वजनिक 4 खासगी 150, चिपळूण सार्वजनिक 13 खासगी 300, अलार सार्वजनिक 5 खासगी 30, गुहागर सार्वजनिक 6 खासगी 100, खेड सार्वजनिक 14 खासगी 300, दापोली सार्वजनिक 27 खासगी 300, मंडणगड सार्वजनिक 4 खासगी 183, बाणकोट सार्वजनिक 11 खासगी 200, पूर्णगड सार्वजनिक 10 खासगी 20, दाभोळ सार्वजनिक 3 खासगी 157 दहीहंडी उत्सव साजरे केले जाणार आहे.

Google search engine
Previous articleस्वातंत्र्यदिनी सैन्य दलाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाच पाहिजे : उद्योगमंत्री उदय सामंत
Next articleअल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here