भाट्ये समुद्रात समुद्रासोबत खेळण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी आला. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेले. मात्र येण्यासाठी वेळ झाला आणि समुद्राला भरती आली. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून आलेले हे दाम्पत्य या अजस्त्र लाटांमध्ये अडकले. जीवघेण्या प्रसंगात काय करावे असे असताना या दाम्पत्याने शहर पोलिसांकडे संपर्क साधला. मात्र अजस्त्र लाटांमध्ये या दाम्पत्याला वाचवण्यात अडचणी येत होत्या. याचवेळी येथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये या दाम्पत्यासाठी देवदूत ठरले. जीवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढले. जीवाची सुटका होताच दोघा दाम्पत्याने दोघा तरुणांचे अक्षरशः पाय धरत आभार मानले.

Google search engine
Previous articleमाणगाव कुंडलिका नदीत बुडून चौघांचा दुर्दैवी अंत, दोन मृतदेह पोलिसांच्या ताब्यात, दोन जणांसाठी शोधकार्य सुरू
Next articleरत्नागिरीतील जिंदाल कंपनीमधून वायुगळती, वायु गळतीमुळे शाळेतील 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here