रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीमुळे कारभार पूर्णतः ठप्प होता. या कालावधीत रत्नागिरी शहरातील हवा शुद्ध राहिल्याचे अभ्यासातून पुढे आले होते. पुढे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर दिवाळीच्या कालावधीत रत्नागिरी शहर परिसरात नोंद झालेल्या मानकांमध्ये हवा प्रदूषणात थोडी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. फटाके वाजवण्याबरोबरच वाढलेली वाहतूक आणि शहरात सुरू असलेली छोटी-छोटी उत्खननाची कामे ही हवा दूषित होण्यास कारणीभूत ठरली आहेत.

केंद्रीय पर्यावरण विभागाकडून देशभरातील शहरांमध्ये हवा प्रदूषणाचा अभ्यास सुरू केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहरातील प्रदूषणाचा अभ्यास रत्नागिरी उपपरिसरामार्फत गेली दीड वर्षे सुरू आहे. टाळेबंदी कालावधीत मार्च २०२१ आणि टाळेबंदीनंतर एप्रिल २०२१ आणि त्याचवर्षी दिवाळीत २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२१ या कालावधीतील अभ्यासाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यासाठी मिरजोळे एमआयडीसी आणि शहरातील नगरपालिका परिसरात हवामान नोंदणी यंत्रणा बसविली होती. प्रकल्पप्रमुख म्हणून डॉ. पांडुरंग पाटील, सहायक संशोधक डॉ. अजय गौड, क्षेत्र सहायक कैलास जाधव, प्रतिराज पाटील हे काम पाहत आहेत. दोन्ही ठिकाणी घेतलेली मानके दर आठवड्याला प्रदूषण मंडळाला पाठवली जातात. उपपरिसराचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांच्या सहकार्य या प्रकल्पाचे नियोजन केले आहे.

Google search engine
Previous articleकेसरकर यांच्या मंत्रीपदाला आत्तापासूनच भाजपचा विरोध – शिशिर परुळेकर
Next articleमुंबईलगतचं एक गाव गावकऱ्यांनी विकायला काढलंय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here