रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चोऱ्यांना प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.त्या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके रत्नागिरी शहरामधील महत्वाच्या ठिकाणी गस्त घालत असताना 04 डिसेंबर रोजी रत्नागिरी एम.आय.डी.सी येथील आबूबकर आईस फॅक्टरी शेजारी असलेल्या चिकन शॉपच्या ठिकाणी एक इसम ब्राऊन हेरॉईन घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे04 डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा सुमारास एक इसम बुलेट मोटरसायकलवर बसून हातात एक पिशवी घेवून संशयित हालचाली करताना दिसून आल्याने त्याला थांबवून त्याची अधिक चौकशी व तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून “150 ब्राऊन हेरॉईन अंमली पदार्थाच्या पुड्या” व इतर साहित्य पोलिसांना मिळून आले.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे मिळालेला हा सर्व अमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून त्या इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत .