रत्नागिरी टीआरपी साई एजन्सी स्टॉप जवळ डंपरच्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. हा अपघात इतका भीषण होता की, डंपरने धडक दिल्यानंतर दोघे दुचाकीस्वार डंपरच्या मागच्या चाकात अडकून काही अंतर फरफटत गेले. डंपर सोबत फरफटत गेल्याने दोघां दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघांपैकी एकाची ओळख पटली असून दुसर्‍याच्या चेहर्‍याचा पूर्णतः चेंदामेंदा झाल्याने त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. मुक्तेश्वर ठीक रा. विमानतळ प्रशांत नगर असे एका मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. डंपर कुवारबाव येथून जे के फाईलच्या मार्गाने जात होता तर मोटरसायकल चालक देखील याच मार्गाने जात होता.

Google search engine
Previous articleखेड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात, खेड – दापोली मार्गांवर कुवेघाट येथे झाला अपघात
Next articleमहाड आगाराच्या एसटी बसला अपघात, अपघातात १६ प्रवासी किरकोळ जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here