रत्नागिरी : खराब वातावरण आणि सतत बर्फांचा वर्षाव असे खडतर आणि साहसी एक महिन्याचे गिर्यारोहणाचे प्रशिक्षक पूर्ण केल्याचे माहिती शहरानजीक शिरगाव-आडी येथील नवोदित गिर्यारोहक आकाश पालकर यांनी दिली. त्याने हिमालय प्रदेशातील लाहौल भागातील माउंट युमान शिखरावर यशस्वी चढाई करत राष्ट्रध्वज फडकावून रत्नागिरीकरांची मान उंचावली असून भविष्यात गिर्यारोहण क्षेत्रातील मुलांना मार्गदर्शन करणार असल्याचा उद्देश स्पष्ट केला. आकाशने हिमालय प्रदेशातील लाहौल भागात असलेले माउंट युनाम हे ६.१११ मीटर उंचीचे शिखर त्याने यशस्वीपणे सर केले.
त्यानंतर त्याने गिर्यारोहणाचे एक महिन्याचे साहसी प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अॅण्ड अलाईड स्पोर्ट्स या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करून आकाश रत्नागिरीत परतला आहे. या प्रशिक्षणामध्ये त्याने क्लायबिंग वॉल, गिर्यारोहण प्रशिक्षण आणि चाचणी याबरोबरच धावणे, नकाशा वाचन चाचणी, पर्वतारोहण व्याख्यान, प्रशिक्षणाच्या शेवटच्या भागात लोड फेरी ट्रेकिंग पाठीवर २५ ते ३० किलोची बॅग घेऊन ८ किमी धावणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण केले. तसेच त्याची परीक्षाही पास झाला.
या क्षेत्रात आवड असणाऱ्या मुलांना माउंटेनिअर्स असोसिएशन रत्नागिरी या संस्थेमार्फत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येथील मुलांना चांगल्याप्रकारे गिर्यारोहकविषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा असोसिएशनचा उद्देश आहे. जेणेकरून तरुणांना गिर्यारोहणातील प्रशिक्षणासाठी अन्यत्र जाण्याची गरज भासू नये.