मुंबई-गोवा महामार्गावरील खानु मठ पासून राजापुर हतीवले पर्यंत वेग मर्यादा जास्त असणाऱ्या वाहनचालकांकडून स्पीड गनच्या माध्यमातून दंड वसूल करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून अगोदर न रस्त्याचे काम पूर्ण करा आणि नंतर दंड वसूल न करा, अशी मागणी होत आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहने चालवताना महामार्गाच्या दुतर्फा बाजूला वेग मर्यादा बाबत सूचना फलक लावण्यात आले नाही .महामार्गाचे काम प्रगतपथावर असताना प्रवासात हैराण झालेल्या वाहन चालक मालकांना दंडात्मक – कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मुंबई की गोवा महामार्गावर खानू मठ पासून राजापूर हातिवले येथे वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना रत्नागिरी आर टी ओ विभागाच्या स्पीड गन मोहिमेमुळे नाहक त्रास होत आहे. परंतु दुसरीकडे हातखंबा ते वाकेड दरम्यान महामार्गाची दुरावस्था असताना देखील स्पीड लाऊन नाहक त्रास देता असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्पीड गन मुळे चांगल्या रस्त्यांअभावी वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. स्पीड गन कॅमेरा लावून अधिक वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या वाहन चालकांनाकडून दंड वसूल करण्यात येतो. दरम्यान, काही वाहनचालकांनी वेग मर्यादा वाढवल्याने त्यांच्यावर दंड आकारला गेला. याबाबत सोशल माध्यमांवर तीव्र प्रकिया उमटू लागल्या. गेले जवळ दहा वर्ष महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असून त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून खड्डयांमुळे वाहनांचा अक्षरक्ष खुळखुळा होत. यामुळे आर्थिक दृष्टया नाहक त्रास होत असून खड्डयांमधून वाहन चालवून मानेचे आणि कमरेचे आजाराने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शिवाय उडणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे श्वसनाचा आजाराला सामोरे जावे लागत आहे. तसेच गरोदर महिला आणि वयस्कर व्यक्तिंना एकीकडे रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाची उदासीनता गेले जवळपास दहा वर्षे नागरिकांना आर्थिक आणि शारिरीक स्वरुपात सहन करावी लागत आहे. अशातच वाहन चालकांवर खड्डयात रस्ते की रस्त्यात खड्डे ही कसरत गेले दहा वर्षे करत असताना होणारी ही दंडात्मक कारवाई योग्य नसून रस्ते चांगले असतील तर अवश्य दंड आकारा, परंतु रस्त्याचे काम अपूर्ण असताना वाहनचालकांना वेठीस धरणे थांबवा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.