मुंबई : पावसाबाबत महत्वाची बातमी. मोसमी पावसाच्या शेवटच्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांत या महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.
राज्यात अनेक भागात गेल्या आठवडाभरापासून सौम्य हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. 04 सप्टेंबर 2022 दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम हवामान असेल या कालावधीत पावसाची तीव्रता. आर्थिक राजधानी मुंबईसह कोकणाला सर्वात कमी फटका बसणार आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या दोन दिवसापासून काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.
नाशिकमध्ये पावसाने धिंगाणा घातला आहे. सिन्नर शहरासह परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. दातली येथील देव नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तीन गावांचा यामुळे संपर्क तुटला आहे. अजूनही रात्री संततधार पाऊस चालू असल्याने नद्या, नाल्या ,ओढ्याना पूर आल्याचे परिस्थिती निर्माण झाली आहे.तसेच सोलापुरातल्या बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूर आल्याची स्थिती सध्या दिसते. मागील तीन ते चार दिवसांपासून तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागते. आणि त्याचाच परिणाम म्हणजे गावोगावच्या नद्या ह्या ओसंडून वाहताना दिसत आहेत.