रायगड : रायगड जिल्ह्यातील खळबळजनक माहिती समोर येते आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आलीय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.बोटीमध्ये शस्त्र सापडली असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात चोख नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. प्रत्येक वाहनाचीही कसून चौकशी तपास नाकाबंदी दरम्यान केला जात आहे. शोध पथकाद्वारे पुढील तपास केला जात आहे.