रत्नागिरी – जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राच्या परिसरात अपर जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातीत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा- 2022 ही परीक्षा रत्नागिरी जिल्ह्यातील पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी व फाटक हायस्कूल, रत्नागिरी या दोन उपकेंद्रावर शनिवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येणार असून, एकूण 624 उमेदवारांना या परीक्षेस प्रवेश देण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुध, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपण इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पठण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेशास मनाई राहील.हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याबाबत त्यांच्या परीक्षासंबंधी कर्तव्य पार पडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Google search engine
Previous articleचिपळुणात बाटलीबाटलीतून पेट्रोल देणे झाले बंद
Next articleमांडवी समुद्रकिनारी पाण्यासोबत नोटा वाहत आल्याची चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here