खेडमधील मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी तत्पर असलेल्या प्रसाद गांधी यांच्या सामाजिक कार्याचे मनसेकडून कौतुक करण्यात आले. मनसेचे नेते अविनाश जाधव हे नुकतेच खेडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसाद गांधी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांच्या सतत चालू असलेल्या मदत कार्याबद्दल विशेष गौरव व्यक्त केला. या कार्यक्रमास मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, नंदू साळवी, ऋषिकेश मोरे यांच्यासह मदत ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या सन्मानामुळे सामाजिक कार्याला मिळालेला पाठिंबा आणि प्रोत्साहन अनेकांचे मन जिंकणारा ठरला.