रायगड जिल्ह्यातल्या पेण पोलीस ठाणे हद्दीत 15 डिसेंबर मौजे सावरसई गावचे हददितील पेण खोपोली रोडवरील महानगर सी.एन.जी. गॅस पंपा जवळ अज्ञात इसम गोवंशीय वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना वाहतुक केल्याचा प्रकार उघड झाला आहे , वाहतूक करणाऱ्या गाडीचे टायर फुटल्याने टेम्पो चालक टेम्पो मालासह सोडुन पळुन गेल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे . याबाबत पेण पोलीस पोलिसांनी 9,98,000/- रुपये किंमतीचा टेम्पो तसेच गोवंशीय मास ताब्यात घेतले असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995, मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 192 (A), महाराष्ट प्राणी संरक्षण अधि. 1976 चे सुधारित अधि. 2015 चे कलम 5 (A), 5 (C) 9,9 (A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अधिकारी समेद बेग हे करीत आहेत.