पेण, रायगड : 22 एप्रिल रोजी झालेल्या कश्मीरमधील पहलगाम (kashmir pahalgam attack) येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी पेण शहरातील गांधी वाचनालय येथे आज नागरिक व महिला एकत्रित आले होते. यावेळी पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, रायगड जिल्हा पेण,पनवेल,कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे,अण्णा वनगे यांच्यासह अनेकांनी कश्मीर मधील पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून हा निंदनीय हल्ला असल्याचे सांगून गव्हर्मेंट त्यांच्याविरुद्ध योग्य ती पावले उचलणार असल्याचे सांगितले. रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी हिंदू नागरिकांवर ज्या क्रूर व जिहादी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आहे त्याचा जाहीर निषेध केला. तसेच अतिरेकी आपल्या देशात घुसणारच नाही अशा प्रकारची पावले शासनाने उचलली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. कश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण भारतभर निषेध करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून याच भ्याड हल्ल्याचा आज पेण शहरात ही जाहीर निषेध करण्यात आला आहे.