चिपळूण – शहरातील पागमळा येथील मारुती मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चिपळूण येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोहम राजेश सुतार (वय 26, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून सोहम यास दारुचे व्यसन होते. त्याला मासे पकडण्याचा छंद होता. तो दारुच्या नशेत मासे पकडण्यासाठी गेला असताना पाय घसरून पाण्यात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत सोहम सुतार हा पाग येथील मारुती मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या नदीत मासे पकडण्यासाठी गेला होता. यावेळी पाय घसरून तो नदीत पडला. सोहमचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. तेथे जमलेल्या लोकांनी त्याला पाण्याबाहेर काढून कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Google search engine
Previous articleरेल्वेतून पडून झाला तरुणाचा मृत्यू
Next articleराज्यातला आणखी एक प्रकल्प निसटला ; सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here