रत्नागिरी : आपले वीजबिल अपडेट झाले नाही असे सांगून एक ऍप डाउनलोड करायला सांगून रत्नागिरीतील सविता नाटेकर (वय ५९, राहणार नाचणेरोड ) या महिलेची दोन लाख अकरा हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे .याबाबत राहुल चतुर्वेदी व दीपक शर्मा या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यातली फिर्यादी सविता नाटेकर यांनी आरोपींनी फोन करून आपले वीजबिल अपडेट झाले नाही यासाठी प्ले स्टोर मधून क्विक सपोर्ट ऍप डाउनलोड करायला सांगितले त्याप्रमाणे फिर्यादीने हे ऍप डाउनलोड केले त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडून कस्टमर आयडी व अन्य माहिती मागून घेतली त्यांनतर त्यांच्या खात्यामधून दोन लाख अकरा हजार रुपये काढून घेऊन त्यांची ऑनलाईन फसवणूक याबाबत त्यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.