नवी मुंबईतील एनआरआय कॉम्प्लेक्स मधील 47 नंबर इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र या आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसून कुणी जखमी झाल्याची माहिती देखील समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.