बृहन्मुंबई – वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी उडणारी झुंबड लक्षात घेता तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ न दवडता थेट प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटकांना आनंद घेता यावा, यासाठी बृहन् मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ऑनलाईन तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली आहे. प्रणालीचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर रोजी प्राणिसंग्रहालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या सांगता समारंभात करण्यात आला. एवढेच नव्हे तर पेंग्विच्या तीन नव्या पिलांना फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्सा अशी नावे बहाल करुन या हीरक महोत्सवाचा समारोपही आणखी गोड करण्यात आला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय चे उद्घाटन लेडी कॅथरीन फ्रिअर यांच्या हस्ते १९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळा येथे करण्यात आले होते. हे उद्यान महानगरपालिकेकडे सुपूर्द झाल्यानंतर एक सार्वजनिक उद्यान म्हणून त्याच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारली. तेव्हापासून आजवर सातत्याने हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनसामान्यांच्या विशेष पसंतीचे ठिकाण ठरले आहे. प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनी देखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱया पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी उडणारी झुंबड लक्षात घेता तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ न दवडता थेट प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटकांना आनंद घेता यावा, यासाठी बृहन् मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ऑनलाईन तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली आहे. प्रणालीचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर रोजी प्राणिसंग्रहालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या सांगता समारंभात करण्यात आला. एवढेच नव्हे तर पेंग्विनच्या तीन नव्या पिलांना फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्सा अशी नावे बहाल करुन या हीरक महोत्सवाचा समारोपही करण्यात आला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय चे उद्घाटन लेडी कॅथरीन फ्रिअर यांच्या हस्ते दिनांक १९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळा येथे करण्यात आले होते. हे उद्यान महानगरपालिकेकडे सुपूर्द झाल्यानंतर एक सार्वजनिक उद्यान म्हणून त्याच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारली. तेव्हापासून आजवर सातत्याने हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनसामान्यांच्या विशेष पसंतीचे ठिकाण ठरले आहे. प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनी देखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेषतः लहान मुलांसाठी आकर्षण ठरले आहे.