मुंबई – देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अगदीच जवळ असलेलं एक गाव. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गाव अत्यंत दुरावस्थेत आहे. या गावात शासनाची कोणतीही व्यवस्था अजून देखील पोहचू शकलेली नाही. उसगांव तलावाच्या किनाऱ्यावर असलेले ही गांव समस्यांचे माहेरघर बनले आहे. आता तिथल्या समस्यांना कंटाळून तिथल्या लोकांनी आमचा वेगळा देश निर्माण करावा अशी मागणी केली आहे.
या गावात आतापर्यंत रास्ता झालेला नाही परिणामी लोकांना गावात ये जा करण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो.या गावातील शेजारीच असलेल्या तलावातून पाईपलाईन टाकून सर्व पाणी ही वसई विरार महापालिकेतील लोकांना पुरविले जात आहे. मात्र याच आदिवासी बांधवांना साधी एक पाण्याची लाइन टाकून दिलेली नाही. या पाड्यात आजपर्यंत आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी किंवा डॉक्टर आलेला नाही. या पाड्यात आजपर्यंत वीज आलेली नाही, आताही ही लोक अंधारातच राहत आहेत.या पाड्यात 20 ते 22 लाहान बालकं आहेत मात्र इथे अंगणवाडी किंवा शाळा काहीही नाही. एखादा रुग्ण, गर्भवती महिला दवाखान्यात न्यायची तर झोळी किंवा होडीचा आधार या लोकांना घ्यावा लागतो. वर्षानुवर्षे हे आदिवासी बांधव या गावात राहत आहेत, नियमितपणे मतदान करत आहेत तरीही यांच्या घरांना अजूनही घरपट्ट्या लावलेल्या नाहीत.
अनेक समस्यांचा बाजार असेलेले ही आदिवासी गाव शासनांच्या योजनांपासून तर वंचित आहेच मात्र त्यांचे मूलभूत अधिकारही त्यांना मिळत नाही ही दुर्दैव आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी बांधवांच्या एका पाड्यावर ही अवस्था असणे खरंच लाजिरवाणे आहे.रस्ता नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी अर्ध्यावर शाळा सोडली पण मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून आजही इथले तरुण अनेक मुलं घेऊन बोटीतून जीवघेणा प्रवास करत आहेत. आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती झाल्याने आता तरी या गावाला सुविधा मिळाव्यात अशी इथल्या रहिवाश्यांनी मागणी आहे