चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका लहान मुलाचा बुडून मृत्यू झालाय. आलोरे शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील रामवाडी येथील कपडे धुण्यासाठी आलेल्या
1) रेणुका धोंडीराम शिंदे वय 45 , राहणार रामवाडी. मूळ पिंपळी खुर्द चिपळूण. (मयत)
२) लता कदम वय 35 , पिंपळी वरची वाडी (मयत क्रमांक एकची भाची)(मयत)
3) लक्ष्मण शशिकांत कदम वय 8 वर्ष, राहणार पिंपरी वरची वाडी.(मयत)
4) पूजा धोंडीराम शिंदे वय 15 (मयत क्रमांक एक ची मुलगी, जिवंत आहे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे).
काल सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कपडे धुण्यासाठी खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहावरती आली होती. सदर वेळी सोबत असणारा लहान मुलगा पाण्यात काठावर बसून खेळत होता. नदीमध्ये मोठ्याप्रमात शेवाळ असल्याने तो पाय घसरून पाण्यात ओढला गेला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी त्याची आई लता कदम या पाण्यात गेल्या असता त्यांना देखील पाण्याचा अंदाज न आल्याने त्या देखील पाण्यात बुडू लागल्या. त्यावेळी त्यांची आत्या रेणुका शिंदे या ही बुडत असलेल्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या व त्याही पाण्यात बुडायला लागल्या. व काठावर बसलेली त्याची मुलगी पूजा शिंदे वय 16 हिने आरडा ओरडा केला परंतु आजूबाजूला कोणी नसल्याने तिने सख्खा भाऊ शुभम शिंदे वय 20 वर्ष याला फोन करून घटना सांगितली. त्यावेळी तिचा भाऊ,व मावस भाऊ सचिन कुंभार वय 25 असे कामावर चिंचघरी येथील वीट भट्टीच्या कामावरून मोटरसायकल वरून घटनास्थळी आले. त्यावेळी दोघांनी मिळून तिन्ही मयत व्यक्तींना पाण्याबाहेर काढले. सदर वशिष्ठी नदीचा डोह हा मयत मुलगा व दोन महिला बुडालेल्या ठिकाणी साधारण 12 ते 14 फूट आहे असून नदीचे पाणी वाहते आहे.
सर्व मयतांचा इनक्वेस्ट पंचनामा करून पुढील कार्यवाही करत आहोत.
सदर ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र कुमार राजमाने व आलोरे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी भरत पाटील व स्टाफ हजर होते