टेलिव्हिजन आणि डिजिटल विश्वात सामाजिक आर्थिक राजकिय सांस्कृतिक क्रीडा आणि कृषी विषयक बातम्या आणि इतर माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या तसेच कोकणातील हक्काचे व्यासपीठ बनलेल्या माझे कोकण न्यूज चॅनेल ने प्रिंट मीडियामध्येसुद्धा दमदार पाऊल ठेवलय ते दिवाळी अंकाच्या स्वरूपात .
अनेक वर्षांच्या दिवाळी अंकांच्या परंपरेत माझे कोकणने सुद्धा एक पुष्प अर्पण करण्याचा प्रयत्न केलाय .कोकणातील सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या गडकिल्यांच्या कथा .. शौर्याच्या गाथा वाचकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा एक छोटा प्रयत्न आहे.हा दिवाळी अंक कोकणातील वाचकांना नक्कीच आवडेल असा आम्हाला विश्वास आहे .महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तसेच रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री अनिलजी परब यांच्या हस्ते मुंबई या ठिकाणी नुकताच दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी माझे कोकणचे संपादक , संपादकीय सल्लागार ,सहसंपादक यांच्यासह माझे कोकणचे प्रतिनिधी उपस्थित होते .. दिवाळी अंकाचे स्वरूप .. माहितीचा प्रकार पाहिल्यानंतर मंत्री अनिलजी परब यांनी आपलं मत व्यक्त करत ते म्हणाले कि ” माझे कोकणच्या माध्यमातून जो दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आलाय त्याला मी शुभेच्छा देतो..पुढच्या पिढीला कोकणातील गड किल्लांची माहिती व्हावी यासाठी हा अंक उपयुक्त ठरेलं, माझे कोकण हे कोकणातील एक नंबर चे चॅनेल कोकणातील असून विविध माध्यमातून ते काम करतय त्याला माझ्या शुभेच्छा आहेत”.