रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. कुंडलिका नदी पात्रात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. रवाळजे गावातील महिला बुधवारी सकाळी कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. बुडालेल्यांमध्ये तीन महिला आणि एका चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकला यश मिळाले आहे. अद्याप दोन मृतदेहांचा शोध पोलीस घेत आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी महिला सकाळी कपडे धुण्याकरता गेल्या होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर लहान मुलगा देखील होता.महिला कपडे धुत असताना चिमुकला खेळताना पाय घसरून नदी पात्रात पडला. मुलगा पडल्याचे पाहून महिलांना आरडाओरडा केला. शेवटी महिलांनीच चिमुकल्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पहिली महिला देखील बुडाली. महिलेला आणि चिमुकल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यानंतर दुसरी, तिसरी अशा दोघींनी उड्या मारल्या . या दुर्घटनेत कोणीही वाचले नाही.घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. बुडालेल्यांपैकी सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते. दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकला यश आले आहे. अद्याप दोघांचे मृतदेह सापडलेले नाहीत. सिद्धेश सोनार , काजल सोनार , सिद्धी पेडेकर, सोनी सोनार अशी बुडालेल्यांची नवे असून यांपैकी सिद्धेश सोनार आणि सिद्धी पेडेकर या दोघांचे मृतदेह मिळाले आहेत इतर दोन जणांसाठी शिधकारी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.