पुण्याच्या कोथरूड भागातून हरवलेल्या विराज फड या 19 वर्षीय तरूणाचा मृतदेह देवकुंड व्हयू पॉइंट दरीत आढळून आला. ताम्हीणी घाटातील व्ह्यू पॉइंट परीसरात काही पर्यटक आले असता त्यांना एक बॅग आढळली. पोलीसांच्या मदतीने बॅगमधील मोबाईल सुरू केला असता तो विराज फड याचा असल्याचे समजले. त्यानंतर या भागातील दरीमध्ये विराजचा शोध सुरू झाला. वेगवेगळी बचाव पथके, अॅडव्हेंचर टीम, वनविभाग, पोलीस यंत्रणा यासाठी काम करत होत्या. खोल दरीत बचाव पथकाला विराज याचा मृतदेह आढळून आला स्ट्रेचर आणि दोराच्या सहाय्याने विराजचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.