महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई रायगड जिल्हा आयोजित पनवेल तालुका यांच्या विद्यमाने प्रथम वर्धापनदिना निमित्त पुरस्कार, सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके (vasudev balavant fadke) सभागृहात संपन्न होणार आहे. पत्रकारिता, राजकीय, सामाजिक शैक्षणिक, उद्योजक, कला, क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
रायगड जिल्हा सह पेण तालुक्यातील सात रत्नांना त्यांच्या उल्लेखनीय कामा बद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड मंगेश नेने (adv. Mangesh Nene) यांना शैक्षणिक क्षेत्रात आदर्श शिक्षण तज्ञ पुरस्कार, डॉ. किशोर देशमुख (Dr. Kishor Deshmukh) यांना सि.एफ. आय. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व पैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार, अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर (Kalpesh Thakur) यांना समाजसेवेकरिता देवदूत पुरस्कार तर अनिल खामकर (Anil Khamkar) यांना महाराष्ट्र पोल्ट्री योध्या शेतकरी संघटना पुरस्कार, सचिन शिंगरुत (Sachin Shingarut) यांना राष्ट्रीय खेळ रत्न पुरस्कार तर डॉ. संजय सोनावणे (Dr. Sanjay Sonawane) यांना उद्योग क्षेत्रात उद्योगराज पुरस्कार तसेच डॉ. देविदास बामणे (Dr. Devidas Bamne) यांना राज्यशिक्षक पुरस्कार या पेण तालुक्याच्या सात रत्नांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.