रत्नागिरी: ‘होममिनिस्टर’ च्या ‘महामिनिस्टर’ या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला .सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडीत ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगली. यात फायनलिस्टला टक्कर देत रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे या महाविजेत्या ठरल्या . ११ लाखांची पैठणी आदेश भावोजींनी त्यांना बक्षीस म्हणून दिली .
ही पैठणी जिंकल्यावर वहिनींच्या चेहऱयावर आनंद ओंसांडुन वाहत होता . आपल्या भावना व्यक्त करताना लक्ष्मी ढेकणे म्हणाल्या , महामिनिस्टर मध्ये ११ लाखाच्या पैठणीची मी मानकरी ठरले याचा मला प्रचंड आनंद होतोय . या प्रवासात मला मैत्रिणी भेटल्या , बरेच चांगले अनुभव आले, आम्ही खूप धम्माल , मज्जामस्ती केली हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे . ‘महामिनिस्टर’ नंतर आता ‘खेळ सख्यांचा चारचौघींचा’ हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.