पुण्याजवळच्या वरंध घाटात भीषण अपघात झालाय. इको कार १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर ५ जण जखमी आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतेय. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुण्यातील भोर – महाड मार्गावरील वरंध घाटात पहाटे भीषण अपघात झालाय. इको कार 100 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक जणाचा मृत्यू झालाय, तर ५ जण जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येतेय.मिळालेल्या माहितीनुसार, इको कार महाडहून भोरच्या दिशेने येत होती. त्यावेळी पहाटे चार वाजता वरंध घाटातील उंबरडे गावच्या हद्दीत कार अचानक १०० फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.वरंध घाटातील अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याशिवाय बचाव पथकही तात्काळ पोहचलं. स्थानिक शिरगाव रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढलं. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

Google search engine
Previous articleप्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून, अनैतिक संबंधातून पतीचा काढला काटा
Next articleचिपळूण पोलिसां तर्फे दंगा काबू मॉक ड्रिल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here