रायगड जिल्ह्यातल्या महाड आगारातून सुटलेल्या गोठवली गावाकडून महाडच्या दिशेने येत असलेल्या एसटी बसला निगडे सावंतवाडी गावाच्या हद्दीत अपघात झाला . एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने बस चालकाने बस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु बस रस्त्याच्या बाजूच्या शेतातील विहिरीला जाऊन धडकली. बस शेतातून घसरत शेतामध्ये असणाऱ्या विहिरीजवळ येऊन थांबल्याने मोठा अनर्थ टळला.या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करीत होते या पैकी १६ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली असून जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे, या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून जखमीमधील सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे एमआयडीसी पोलीस आणि एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.