रायगड – महाड शहरातील पंचशील नगर-नवेनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा -> https://youtu.be/o19o8_Mt5PQ
नवे नगर येथील रहिवाशी प्रदीप अनंत सोंडकर यांनी संबंधित आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व आरोपी हे एकाच नगरांमधील राहणारे असून एकमेकांचे शेजारी आहेत.
रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरीला जात होते, तब्बल सहा महिने हा प्रकार सतत चालू होता याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांनी सीसीटीव्ही बसवले आणि या सीसीटीव्ही फुटेज मध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झाला. निलेश इल्या बाळा एनकर असे कपडे चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.