रस्त्यावर अनधिकृत पार्क करण्यात आलेल्या गाडीचा फोटो पाठवणाऱ्यास ५०० रुपये बक्षीस दिले जाणार आहे. केंद्र सरकार येत्या काळात पार्किंग संदर्भात अशा प्रकारचा कायदा लागू करणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात त्यांच्या भाषण करत असताना याबद्दल माहिती दिली.

गडकरी म्हणाले की रस्त्यावर अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्यामुळे वाहतुकीस आणि रहदारीस मोठं अडथळा निर्माण होतो . लोक मोठी घर बांधतात पण त्यात गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा ठेवत नाहीत. अधिकृत  पार्किंगची समस्या दूर व्हावी यासाठी केंद्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे. ज्यात रस्त्यावर अनधिकृतपणे पार करण्यात आलेल्या गाडीचा फोटो काढून पाठवल्यास ५०० रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत. म्हणजेच दंडाची रक्कम १००० रुपये असल्यास त्यातील ५०० रुपये फोटो पाठवणाऱ्यास  दिले जातील.

यावेळी जास्त वाहने  बाळगणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त करताना गडकरी म्हणाले की ज्यांच्या कुटुंबामध्ये चार सदस्य आहेत त्या कुटूंबामध्ये देखील सहा गाड्या पाहायला मिळतात. नागपूरमध्ये माझ्या स्वयंपाक्याकडे दोन सेकंड हॅन्ड गाड्या आहेत. या गोष्टी पूर्वी अमेरिकेत पाहायला मिळत होत्या. तिथे सफाई करणाऱ्या महिलेकडे देखील गाडी असायची. ते पाहून आम्ही आश्चर्यचकित व्हायचो . यावेळी गडकरींनी स्वतःचे उदाहरण दिले, ते म्हणाले की माझ्या नागपूरच्या घरी १२ गाड्यांची पार्किंग बनवली आहे. मी एकही गाडी रस्त्यावर उभी करत नाही. त्यातच दिल्लीकरांना टोला लागवताना गडकरी म्हणाले आम्ही रस्ते त्यांना गाड्या उभ्या करण्यासाठीच बांधून दिले आहेत . त्यामुळे ते स्वतःला भाग्यवान समजतात.

Google search engine
Previous articleगेला पाऊस कुणीकडे ?
Next articleरत्नागिरी : गंगा आगमनानंतर पाऊस लंबल्याची प्रचिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here