प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या व रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी ची रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्यामुळे जगबुडी आणि वाशिष्टी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण झाले आहे, रासायनिक सांडपाणी नदीत मिसळल्यामुळे, सोनपात्रा नदी तसेच जगबुडी आणि वाशिष्टी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे मेल्याचे समोर आले आहे, गेल्या काही महिन्यांमध्ये रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटण्याची ही तिसरी घटना आहे. मोठ्या प्रमाणावर मासे मेल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या भोई समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे, आता एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.