माणगांव – रायगड – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम काल रायगड मधील माणगांव मध्ये पार पडला . यासाठी लाडक्या बहिणींना आणण्यासाठी हजारो बसेस एसटी महामंडळाच्या या रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये महिलांना घेण्यासाठी गेल्या होत्या.
श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना एका बसचा मांजरोने घाटात अपघात झाला .यामध्ये काही महिला जखमी झाल्यात ही बस म्हसळा येथून माणगाव कडे येतं असताना बाजूच्या दरीत घासरल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . एसटी घेऊन गेलेलं चालक हे नवीन असल्यानं मुख्य वळणावरिल हा अंदाज न आल्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जवळजवळ 20 फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळली. मात्र सुदैवाने या अपघातात महिला सुखरूप आहेत .