गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा! (krishna Janmashtami 2022) गोकुळाष्टमीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. गोकुळाष्टमीच्या सणाचे महत्व भारतीय संस्कृतीत अनन्य साधरण आहे.
संपूर्ण भारतभरात रात्री बारा वाजण्याची वाट लोक आतुरतेनं पाहतात आणि मग आपल्या लाडक्या गोविंदाच्या जन्माच्या उत्सव साजरा करतात. (Dahikala Recipe) जन्माष्टमीला नेहमीच दही, दूधाचा नैवेद्य बनवला जातो. हा नैवेद्य बनवायला तुम्हाला ५ मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागेल. दही काल्याची सोपी, परफेक्ट रेसेपी (How to Make Gopalkala Recipe) पाहूया
साहित्य (Quick Dahikala Recipe)
१ ते दीड वाटी पोहे
१ बारीक कापलेली काकडी
१ वाटी डाळींबाचे दाणे
१ ते दीड वाटी दही
अर्धा कप किसलेलं ओलं खोबरं
आवडीनुसार काजू
चवीनुसार कोथिंबीर
४ ते ५ कढीपत्त्याची पानं
५ मध्ये चिरलेल्या तिखट मिरच्या
चिमूटभर हिंग
चिमूटभर जीरं
अर्धा चमचा मोहोरी
चवीनुसार मीठ
२ चमचे तूप
कृती
१) सगळ्यात आधी पोहे स्वच्छ धुवून घ्या.
२) मग त्यात कोथिंबीर, काकडी, मीठ, डाळींबाचे दाणे हे सर्व पदार्थ एकत्र करा. नंतर या मिश्रणात दही घाला.
३) गॅसवर लहानश्या कढईत तूप घालून मिरचीचे तुकडे घालून तळून घ्या. नंतर यात जीरं, राई, हिंग घाला.
४) सगळ्यात शेवटी हिंग घालून गॅस बंद करा. तयार फोडणी पोह्यांच्या मिश्रणात घालून एकजीव करून घ्या. तयार आहे दहीकाला.