कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी ७ आणि ८ डिसेंबर रोजी करमळी – वेर्णास्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रामुख्याने चंदीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस, नागपूर-मडगाव एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर बदल केला आहे. तर, इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.कोकण रेल्वेच्या करमळी – वेर्णा विभागात ७ डिसेंबर रोजी दुपारी ४.१० ते सायंकाळी ५.५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक रेल्वेगाड्यांना लाल सिग्नल दाखवला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १२२१८ चंदीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस करमळी स्थानकाच्याआधी ४५ मिनिटे थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस करमळी स्थानकाच्या आधी ७० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. सुमारे एक ते दोन तास रेल्वेगाड्यांना थांबा दिल्याने इतर रेल्वेगाड्या देखील विलंबाने धावतील.

Google search engine
Previous articleरत्नागिरीत “ब्राउन हेरॉईन” अंमली पदार्थ जप्त, रत्नागिरी शहर गस्तीदरम्यान केली कारवाई
Next articleमहामार्ग कोमात, आरटीओ विभाग जोमात, आरटीओच्या स्पीड गन मोहिमेमुळे नाहक त्रास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here