कोल्हापूर: कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका विचित्र अपघाताच चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून धडक दिली.यानंतर अपघातग्रस्त कारला एका ट्रकने मागून धडक दिली. ही घटना इतकी भयंकर होती की या तिहेरी अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, घटनेमध्ये मृत्यू झालेले चारही जण बंगळुरू येथील रहिवासी होते. घटनास्थळावरील काही  या अपघातामध्ये गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी येथे झालेल्या या विचित्र अपघातात चार जण ठार झालेत आहेत.

आज पहाटे हा अपघात घडला असून एक्सेल तुटल्याने महामार्गावर उभा असलेल्या ट्रकला महिंद्रा कार जाऊन धडकली तर कारच्या मागून येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रकही अपघातग्रस्त कारला मागून धडकला. या विचित्र अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून कारमधील तिघे जागीच ठार झाले तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत सर्व बंगळुरू येथील एकाच कुटुंबातील आहेत.

दरम्यान ४-५ दिवसांपूर्वी कोल्हापुरामध्ये आणखी एक भीषण अपघात झाला होता. यात मोटारसायकल आणि कंटनेरचा गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर हुनगीनहाळजवळ भीषण अपघात झाला होता. यात 25 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचं नाव उमा मार्तंड जरळी (वय 25) असं होतं. तरुणी महागाव येथील रुग्णालयात सेवा देत होती.

Google search engine
Previous articleकिल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला पडल्या भेगा, तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती
Next articleआषाढी यात्रेत यंदा प्रथमच माऊली स्क्वॉड, 200 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here