रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हळूहळू पॅसेंजर गाड्या विजेवर चालवण्यास आरंभ झाला आहे. मत्स्यगंधा, नेत्रावतीपाठोपाठ कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेस शनिवारपासून विजेवर धावणार आहे. प्रदूषणमुक्त आणि वेगवान प्रवासासाठी विजेवर धावणार्या इंजिनचा उपयोग होणार आहे.जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार असल्याने तिच्या प्रवासात काही कालावधीची बचत होणार आहे. या गाडीचा क्रमांक बदलण्यात येणार आहे .
मडगाव-सीएसएमटी कोकणकन्या (१०१११/ १०११२) आणि मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेसला विजेचे इंजिन जोडण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या ७४१ किलोमीटर मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण मार्च महिन्यात पूर्ण झाले होते. आतापर्यंत सर्व गाड्या डिझेल इंजिन जोडून सोडल्या जात होत्या. विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर सुरवातीला मालगाड्या विजेच्या इंजिन लावून चालवण्यात आल्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उर्वरित गाड्या सोडल्या जात आहेत. आतापर्यंत पाच गाड्या विजेवर धावत आहेत.