राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला आहे. राज्यासह तळ कोकणातून एक गुहागरची जागा वगळता सर्व जागेवर महायुतीने विजय मिळवला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महायुतीच्या गाठबंधनाचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना तर उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली.हिवाळी अधिवेशनात संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरच्या राजभवन येथे अधिवेशनाच्या पूर्व संध्येला संपन्न झाला. महायुतीने तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नितेश राणे, रत्नागिरी मधून उदय सामंत कॅबिनेट तर दापोलीतील योगेश कदम राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनच्या आदिती तटकरे व महाड पोलादपूरचे भरत गोगावले या दोघांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ मिळाली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नितेश राणे यांच्या पारड्यात पालकमंत्री पद पडणार असून रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत आणि योगेश कदम यांच्यापैकी कुणाकडे पालकमंत्री पदाची सूत्रे जाणार हा औसूक्याचा विषय ठरलेले आहे. त्याशिवाय ते दोघेही एकाच पक्षाचे असल्यामुळे दोघांमध्ये चढाओढ दिसत आहे. परंतु, रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि पोलादपूर -महाडचे भरत गोगावले यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि महाड पोलादपूरचे भरत गोगावले या दोघांनीही कॅॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या शपथविधीच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या समर्थकांमधून आमचाच पालकमंत्री अशा स्वरूपाचे बॅनर लावून जिल्ह्यात गटबाजीचे राजकारण सुरु केलेले दिसत आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा कायम असून राज्यासह ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद सुरु आहे.