फेंगल चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर पुडुचेरी व उत्तर तामिळनाडू या भागात धडकल्यानंतर आता या वादळाची भीती कोंकण किनार पट्टी भागात देखील वर्तविण्यात आली होती. मात्र या वादळाचा कोकण किनारपट्टीवर जास्त परिणाम होणार नसला तरी समुद्र किनाऱ्यावर खबरदारी म्हणून मच्छी मार बांधवांना शासनाकडून सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर रायगड जिल्हयातील सर्व व्यवसायिकांनी आपापल्या बोटी किनाऱ्यावर लावल्या आहेत. या वादळामुळे कोंकण किनारपट्टीवरिल रायगड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. याच पार्श्भूमीवर जिल्हयातील प्रशासनाकडून सर्व विभागांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानंतर किनाऱ्यावर या नौका विसावलेल्या पहायला मिळतायेत.