पेण प्रतिनिधि – किरण बांधणकर

पेण तालुक्यातील वरवणे आदिवासी आश्रम शाळेत खुशबू ठाकरे ह्या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठ रोगावरील उपचारादरम्यान मृत्यूला सहा महिने उलटूनही गुन्हे नोंद करण्यास विलंब होत असल्याने खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणात (Khushboo Thackeray death case) आरोग्य विभाग जाणीव पूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खुशबू चे वडील नामदेव ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान खुशबू ठाकरे प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल २७ फेब्रुवारी दोन हजार पंचविसाला परस्पर राज्य शासनाला दिला जातो मग हाच अहवाल पोलिसांना का दिला जात नाही? असा प्रश्न विचारीत १) आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल व खुशबू ठाकरे चा केमिकल ऍनालिसिस रिपोर्ट पोलिसांना देऊन सार्वजनिक करण्यात यावा २) पोलिसांनी खुशबूच्या पालकांच्या व सामाजिक संघटनांच्या तक्रारी निवेदनाच्या आधारावर दोषींवर गुन्हे दाखल करावे ३) खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण चौकशी समितीने आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती विखे यांचा कोणताही जबाब चौकशीत ग्राह्य धरू नये व खुशबू प्रकरणात चालढकल करणाऱ्या विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सदर पदावरून तत्काळ कार्यमुक्त करावे व त्यांच्यावरही सदर प्रकरणात हलगर्जीपणा केला म्हणून त्यांचेवरही गुन्हा दाखल करावा ४) खूशबू ठाकरे हिच्या पालकांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. ५) आदिवासी आश्रम शाळेतील विद्यिर्थ्यांचा आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. या मागण्यांसाठी मागील सहा महिने सातत्याने पाठपुरावा करणारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, खुशबूचे कुटुंबीय व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक १६ जुलै रोजी पेण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन यापुढील पाठपुरावा तहसील कार्यालयामार्फत केला जाईल असे सांगत याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल, केमिकल एनालिसिस रिपोर्ट उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न केले जातील असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले पत्र ती आंदोलन मागे घेण्याबाबतचे पत्र देत ही आंदोलन मागे घेण्याच्या विनंतीवरून पंधरा ऑगस्ट पर्यंत सदरचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत मात्र पंधरा ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे.

यावेळी खुशबू ठाकरेचे वडील नामदेव ठाकरे,आई, शेवंती ठाकरे, आजोबा,राघ्या ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, राजेश रसाळ, महेश पाटील, ग्राम संवर्धन समिती सदस्य नरेश कडू, महादेव शीद, अशोक शिद, लक्ष्मण मेंगाळ, नरेश ठाकरे, गणेश ठाकरे, जानू वाघमारे, चंद्रकांत खाकर, नरेश कडू, नामदेव केवारी, हरी शिद, सोपान निवळकर, मीनल तांडे, यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.

Google search engine
Previous articleरत्नागिरी पोलिसांकडून दंगल नियंत्रण सरावाचे आयोजन; आगामी गणेशोत्सव, जन्माष्टमी सणांच्या पार्श्वभूमीवर तयारी
Next articleसीआयओ रत्नागिरीकडून पर्यावरण जनजागृतीचा अभिनव उपक्रम: लहानग्यांनी घेतली वृक्षारोपणाची शपथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here