खेड एसटी स्थानकात मध्यरात्री चांगलाच धुमाकूळ घातला गेला… आणि तोही एसटी कर्मचाऱ्यांकडूनच! फ्री स्टाईल हाणामारीचा थरार थेट स्थानकाच्या समोर… आणि सगळं कैद झालं कॅमेऱ्यात.
सोमवारी मध्यरात्री खेड एसटी स्थानकाबाहेर दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता ती हाणामारीत रूपांतरित झाली. दोघंही कर्मचाऱ्यांनी एकमेकांना अक्षरशः फ्री स्टाईलने बदडून काढलं.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, हे दोघेही कर्मचारी त्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होते. काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये ही संपूर्ण घटना शूट केली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली.
विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात अशाच प्रकारे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या एका एसटी चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
ही घटना घडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष राज्य परिवहन महामंडळ कोणती कारवाई करते याकडे लागले आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची वागणूक आणि तीही सरकारी कर्मचाऱ्यांकडून, नक्कीच गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे.
(व्हिडीओ फुटेज- मारामारीचा व्हायरल व्हिडीओ)
👇👇👇👇👇
सध्या तरी परिवहन महामंडळाकडून या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण अशा घटनांमुळे एसटीची प्रतिमा डागाळत असल्याचं स्पष्ट आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.