रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड दापोली मार्गावरील कुवे घाटामध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने धडक देऊन अपघात केला आहे, खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते हे दापोली पोलीस ठाण्यात जात असताना कुवे घाटामध्ये आले असता समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या काळ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीला समोरासमोर ठोकर दिली, स्कॉर्पिओ चे मोठे नुकसान झाले आहे, सुदैवाने गाडीत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते त्यांचे चालक, अंगरक्षक सुरक्षित आहेत, खेड दापोली मार्गावर कुवे घाटामध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे