रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील भूमी अभिलेख कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मोजणी होऊन देखील शेतकऱ्यांना नकाशे भेटत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या कार्यालयात छाननी लिपिक म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या मंदार भाटकर यांनी भूमि अभिलेख कार्यालयातील तब्बल १६ गहाळ करून अनधिकृत असल्याचा ठपका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेड यांनी ठेवला असून छाननी लिपिकावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची परवानगी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रत्नागिरी यांच्याकडे लेखी स्वरूपात मागितले आहे गेल्या वर्षभरापासून भूमि अभिलेख विभाग चर्चेत असून जागेची मोजणी न करता बनावट नकाशा देऊन एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी याच छाननी लिपिकावर व तत्कालीन त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आता पुन्हा एक नाही दोन नाही तर जमिनीच्या मोजणीची प्रकरणे चक्क कार्यालयातूनच गहाळ झाल्याने आता त्या अधिकाऱ्या विरोधात थेट गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे