खेड – रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली, विजांचा कडकडाट आणि मुसळधार वादळी पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली, खबरदारीचा उपाय म्हणून खेड शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला होता.